Surprise Me!

Kolhapur : भाजी विक्रेत्यांकडून महिलांकडून थुंकीमुक्त अभियानासाठी प्रबोधन| Sakal Media |

2021-10-02 500 Dailymotion

जगात बदल घडवायचा असेल तर स्वतःपासून बदल घडवायला सुरुवात केली पाहिजे. या गांधीजींनी दिलेल्या उक्तीला स्मरून या निमित्ताने कपिलतीर्थ भाजी मार्केट येथील भाजी विक्रेत्या आज थुंकीमुक्त अभियानात हिरीरीने सामील झाल्या. 'Antispitting movement' अर्थात थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळतर्फे गांधी जयंती चे औचित्य साधून प्रबोधनाचे कार्यक्रम करण्यात आले. तसेच मी सार्वजनिक ठिकाणी रोगराई पसरवणार नाही. दुसऱ्याला थुंकून देणार नाही. पर्यावरण स्वच्छ ठेवेन अशी शपथ घेतली. दीपा शिपुरकर यांनी शपथेचे वाचन केले. यानंतर प्रबोधनपर फेरी घेण्यात आली. 'भावा हे कोल्हापूर हाय इथं थुंकायला परवानगी नाय, आमचं कोल्हापूर निरोगी कोल्हापूर, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.<br /><br />बातमीदार - अमोल सावंत <br />व्हिडीओ - बी. डी. चेचर<br />#Kolhapur #antispitting #marathinews #breakingnews #esakal #sakal #sakalnews #sakalmedia

Buy Now on CodeCanyon